तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
बुद्धगयेपासून सुमारे दोन मैलावर निरंजना नदी वाहते, एलतिरावर गया तर पैलतीरावर पूर्वेला उरुवेला नामक एक अतिशय सुंदर गाव आहे, त्याच्या छायेतच सेनानी नावाचे छोटेसे खेडे वसलेल्या आहे, या ठिकाणी सेनानी नावाचा एक प्रतिष्ठित आणि सन्मानित व्यक्ति राहत असे तिच्या नावावरूनच या गावास सेनानी नाव पडले ,त्याच्याकडे अनेक गायी होत्या म्हणून त्याला ग्वालराज म्हणत.. सेनानीच्या विवाहाच्या काही वर्षानंतर त्याच्या कुटुंबात कन्या जन्मस आलि तिचे नाव "सुजाता" होते. त्या गावी असलेल्या वटवृक्षाची अशी ख्याती होती की, जो कोणी त्या वृक्षाची मनोभावे पूजा करेल त्यास मनोवांचीत फलप्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही ,एके दिवशी श्रद्धावान सुजातानेही वटवृक्षरुपि या वृक्षराजाची पूजा करून इच्छा प्रगट केली की, जर मला सुंदर -सुशील व कर्तृत्ववान वर मिळेल आणि त्याच्यासोबत पहिल्या संतानाच्या रूपाने पुत्रप्राप्ती होईल तर मी निर्जल दुधाची "मधुपायस" चढून पूजा करेल. हीच ति...