तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
बाबासाहेबांनी धर्मांतर करण्यासाठी नागपूरची निवड कोणत्या करणामुळे केली? विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता मोठी धम्म क्रांती घडवून आणल्याचा उल्लेख नेहमी केला जातो. अशोक विजयादशमी हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणूनच ओळखला जातो. दरवर्षी या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. परंतु, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड का केली? यामागं नेमकं कारण काय आहे? बाबासाहेबांची घोषणा आणि बौद्ध धम्माचा स्वीकार हिंदू धर्मात दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यामुळेच त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही," असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर विविध धर्मांचा अभ्यास करून त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 1956 पर्यंत धर्मांतर कधी व कुठे होणार याबाबत सर्व...