मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

'Dhammadut"

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
अलीकडील पोस्ट

तथागत भगवान बुद्ध यांच्या जीवनात पौर्णिमेचे महत्त्व.. माघ पौ्णिमा..

माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेला पाली भाषेत 'माघ मासो' म्हणतात. ही पौर्णिमा साधारणत:फेब्रुवारी महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या.  पहिली घटना-बुद्धांची महापरिनिब्बाणाची घोषणा माघ पौर्णिमेच्या दिवशी वैशाली या ठिकाण तथागत गौतम बुद्धांनी "आजपासून तीन महिन्यानंतर अर्थात वैशाख पोर्णिमेला महापरिनिर्वाण प्राप्त करतील" अशी घोषणा केली. तो दिवस इ. स. पुर्व ४८४ माघ पोर्णिमेचा होता.  दुसरी घटना -  वैशालीचे अंतिम दर्शन. तथागत भगवान बुद्ध आपल्या महापरिनिर्वाणाच्या घोषणेच्या दुसर्‍या दिवशी वैशाली नगरीत आपल्या अंतीम यात्रेसाठी गेले. यात्रा समाप्त करून त्यांनी नगरीच्या बाहेर निघताना फिरून वैशालीकडे पाहीले व म्हणाले "आनंद, हे माझे वैशालीचे अंतीम दर्शन आहे."  तथागतांचे तीन महिन्यानंतर होणार्‍या महापरिनिर्वाणाची वार्ता वैशालीवाशीयांपर्यंत पोचल्याने  वैशालीचे सर्व लिच्छवी जनता दु:खी अंतःकरणाने भगवान बुद्धांच्या मागे मागे शहराच्या बाहेर पर्यंत आले. भगवान बुद्धांनी मागे येण्यासही मनाई केली असता ते त्यांचे ऐकत नव्हते. त्यां...

#धम्मचक्र

बाबासाहेबांनी धर्मांतर करण्यासाठी नागपूरची निवड कोणत्या करणामुळे केली?  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता मोठी धम्म क्रांती घडवून आणल्याचा उल्लेख नेहमी केला जातो. अशोक विजयादशमी हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणूनच ओळखला जातो. दरवर्षी या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. परंतु, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड का केली? यामागं नेमकं कारण काय आहे?  बाबासाहेबांची घोषणा आणि बौद्ध धम्माचा स्वीकार हिंदू धर्मात दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यामुळेच त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही," असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर विविध धर्मांचा अभ्यास करून त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 1956 पर्यंत धर्मांतर कधी व कुठे होणार याबाबत सर्व...

"तथागताच्या जीवनात आषाढीपौर्णिमेस घडलेल्या महत्त्वाच्या घटना"

आषाढी पौर्णिमा :-  शाक्यमुनी भगवान, सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस महत्त्वाच्या चार घटना .                           पहिली घटना:-"राणी महामायेचे स्वप्न"  आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते, राणीने या स्वप्नात पाहिले की, चारही दिशेने दूत येतात राणीचा शाही पलंग  उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शाल वनाजवळ अनोतवदह नावाच्या सरोवरावर नेतात व सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षाखाली ठेवतात सर्वांगास सुगंधी लेप लावून राणीला स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात, राणीस सुगंधी फुलांनी सजवितात, काहीवेळाने सहा दातांचा शुभ्र गजरात येतो त्याने आपल्या सोंडेने श्वेत कमल पुष्पाची माळ धारण केलेली असते. राणीच्या शयये भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो ,नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते राजाला सांगितले तेव्हा त्...

आळारकालाम

  आळारकालाम घर सोडून बोधिसत्त्व थेट राजगृहाला गेले , तेथे त्यांची  व बिंबिसार राजाची भेट झाली आणि तदनंतर ते आळार कालामाकडे जाऊन त्याचे तत्त्वज्ञान शिकले , अशा अर्थाचे वर्णन जातकच्या निदनकथेत सापडते.अश्वघोषकृत बुद्धचरितकाव्यात निदानकथेचाच क्रम स्वीकारला आहे. ‘ बोधिसत्त्व प्रथम वैशालीला गेले व तेथे आलार कालामाचा शिGष्य झाले आणि नंतर राजगृहाला गेले ,  तेथे बिंबासार राजाने त्याची भेट घेतल्यावर तेउद्रक रामपुत्रापाशी गेले. ’  अशा प्रकारचे सविस्तर वर्णन आहे. सो एवं पब्बजितो समानो किंकुसलगवेसी अनुत्तरं सन्तिवरपदं परियेसमानो येन आळारो कलामो तेनुपसकमिं। ( भगवान म्हणतो) , “ याप्रमाणे प्रव्रज्या घेतल्यावर हितकर मार्ग कोणता हे जाणण्याच्या उद्देशाने श्रेष्ठ , लोकोत्तर , शान्त तत्त्वाचा शोध करीत मी आळार कामापाशी गेलो. ” बोधिसत्त्व राजगृहाला न जाता प्रथमत: आळार कालामा पाशी गेले. आळार कालाम कोसल देशाचाच रहिवासी होता.. शाक्य आणि कोलिय राज्यांत त्याची बरीच ख्याति होती. त्याच्या एका शिष्याचा--भरण्डू कालामाचा-- आश्रम कपिलवस्तूला होता. दुसरे त्याचे किंवा फार झाले तर उद्दक रामपुत्ताचे ...

Dahā pāramitā baud'dhism

  पारमिता ह्या शील मार्ग  आहे .. Dahā pāramitā baud'dh ism # 10 PARAMITA IN BUDDHISM १) शील ( 1  PARAMITA IN BUDDHISM) शील म्हणजे नीतिमत्ता , वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. आपण  दानधर्म पुष्कळ केला ; किंबहुना आपला प्राणहि लोककल्याणासाठीं देण्यास तयार झाला ; पण आपले शील निर्मळ  नसलें , तर सन्मार्गांत तुमची उन्नति होणार नाहीं. प्राणघातापासून अलिप्‍त राहणें , खोट्या मार्गानें पैसा न कमावणें , मद्यपानादिक व्यसनापासून दूर राहणें व योग्यकाळापर्यंत ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमांत एकपत्‍नीव्रत पाळणें ह्याला शील म्हणतात.दानधर्म करणें चांगलें ; परंतु त्यायोगें आपले शील मलिन होत असलें , तर तो न केलेला बरा. लबाडीनें पैसा मिळवून किंवा चोरी करून मोठा दानधर्म करण्यापेक्षां शील परिशुद्ध ठेवून दिलेला पैसा अधिक श्रेयस्कर आहे २)   दान ( २  PARAMITA IN BUDDHISM) स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता , रक्त , देह अर्पण करणे. प्रथमतः तुम्ही गोरगरीबांना व आंधळ्यां पांगळ्यांना दानधर्म करा. दानानें तुमच्या मनांत कोमल द...

#अष्टांगिक मार्ग ASTANGIK MARG

  बुद्धांनी,Tathagat Buddha-    सारनाथ   येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘ अष्टांग मार्ग ’ किंवा ‘ मध्यम मार्ग ’ सांगितला. अष्टांगिक मार्ग ASTANGIK MARG BY TATHAGAT BUDDHA .. अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या अंगीकारल्यास मानवाचे जीवन सुखमय होते.(Aary Astamgik marg ) १) सम्यक् दृष्टी   :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. २) सम्यक् संकल्प   :- म्हणजे योग्य निर्धार , विचार. ३) सम्यक् वाचा   :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्‍न करणे. ४) सम्यक् कर्मान्त   :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे. ५) सम्यक् आजीविका   :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. ६) सम्यक् व्यायाम   :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. ७) सम्यक् स्मृती   :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मना...