धम्माचा "दायक" बनण्याच्या इच्छेपोटी महाराज अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना बोलावून विचारले काय आपण दोघेही "प्रवज्जा" ग्रहण कराल?मुलांनी उत्तर दिले ,देव!जर आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवजीत होऊ "प्रवज्जा" ग्रहण करण्याने आमचे व आपले कल्याण होईल असे आम्हाला वाटते, या कुशाग्रवादी व बलवान मनाने स्वामी असलेल्या बालकांचा दीक्षाविधी अतिशय समारंभपूर्वक व धुमधडाक्यात पार पडला .सम्राट कन्या संगमित्रा व पुत्र महेंद्र धन्य होत, त्यांनी केवळ आपल्या पित्याच्या इच्छे खातिर गृहस्थ जीवनाचा त्याग करून "प्रवज्जा" घेतली जेव्हा महामिती महेंद्रस प्रवर्तित होऊन बारा वर्षे पूर्ण कालावधी झाला होता 'तेव्हा उपाध्यायने आणि संघाने मनोरम लंका द्वीपमध्ये जाऊन बुद्धधम्माच्या स्थापनेची आज्ञा केली, ती शिरसावंद्य मानून महेंद्राने उपाध्याय आणि संघास वंदन करून चार स्तवीर सोबत घेऊन बौद्ध धम्माच्या स्थापना, प्रचार आणि प्रचारासाठी लंकाद्वीप गाठले तो दिवस "जेष्ठ पौर्णिमेचा" होता!!
आषाढी पौर्णिमा :- शाक्यमुनी भगवान, सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस महत्त्वाच्या चार घटना . पहिली घटना:-"राणी महामायेचे स्वप्न" आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते, राणीने या स्वप्नात पाहिले की, चारही दिशेने दूत येतात राणीचा शाही पलंग उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शाल वनाजवळ अनोतवदह नावाच्या सरोवरावर नेतात व सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षाखाली ठेवतात सर्वांगास सुगंधी लेप लावून राणीला स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात, राणीस सुगंधी फुलांनी सजवितात, काहीवेळाने सहा दातांचा शुभ्र गजरात येतो त्याने आपल्या सोंडेने श्वेत कमल पुष्पाची माळ धारण केलेली असते. राणीच्या शयये भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो ,नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते राजाला सांगितले तेव्हा त्...
टिप्पण्या