तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
पारमिता ह्या शील मार्ग आहे .. Dahā pāramitā baud'dh ism # 10 PARAMITA IN BUDDHISM १) शील ( 1 PARAMITA IN BUDDHISM) शील म्हणजे नीतिमत्ता , वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल. आपण दानधर्म पुष्कळ केला ; किंबहुना आपला प्राणहि लोककल्याणासाठीं देण्यास तयार झाला ; पण आपले शील निर्मळ नसलें , तर सन्मार्गांत तुमची उन्नति होणार नाहीं. प्राणघातापासून अलिप्त राहणें , खोट्या मार्गानें पैसा न कमावणें , मद्यपानादिक व्यसनापासून दूर राहणें व योग्यकाळापर्यंत ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमांत एकपत्नीव्रत पाळणें ह्याला शील म्हणतात.दानधर्म करणें चांगलें ; परंतु त्यायोगें आपले शील मलिन होत असलें , तर तो न केलेला बरा. लबाडीनें पैसा मिळवून किंवा चोरी करून मोठा दानधर्म करण्यापेक्षां शील परिशुद्ध ठेवून दिलेला पैसा अधिक श्रेयस्कर आहे २) दान ( २ PARAMITA IN BUDDHISM) स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता , रक्त , देह अर्पण करणे. प्रथमतः तुम्ही गोरगरीबांना व आंधळ्यां पांगळ्यांना दानधर्म करा. दानानें तुमच्या मनांत कोमल द...