तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेला पाली भाषेत 'माघ मासो' म्हणतात. ही पौर्णिमा साधारणत:फेब्रुवारी महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पहिली घटना-बुद्धांची महापरिनिब्बाणाची घोषणा माघ पौर्णिमेच्या दिवशी वैशाली या ठिकाण तथागत गौतम बुद्धांनी "आजपासून तीन महिन्यानंतर अर्थात वैशाख पोर्णिमेला महापरिनिर्वाण प्राप्त करतील" अशी घोषणा केली. तो दिवस इ. स. पुर्व ४८४ माघ पोर्णिमेचा होता. दुसरी घटना - वैशालीचे अंतिम दर्शन. तथागत भगवान बुद्ध आपल्या महापरिनिर्वाणाच्या घोषणेच्या दुसर्या दिवशी वैशाली नगरीत आपल्या अंतीम यात्रेसाठी गेले. यात्रा समाप्त करून त्यांनी नगरीच्या बाहेर निघताना फिरून वैशालीकडे पाहीले व म्हणाले "आनंद, हे माझे वैशालीचे अंतीम दर्शन आहे." तथागतांचे तीन महिन्यानंतर होणार्या महापरिनिर्वाणाची वार्ता वैशालीवाशीयांपर्यंत पोचल्याने वैशालीचे सर्व लिच्छवी जनता दु:खी अंतःकरणाने भगवान बुद्धांच्या मागे मागे शहराच्या बाहेर पर्यंत आले. भगवान बुद्धांनी मागे येण्यासही मनाई केली असता ते त्यांचे ऐकत नव्हते. त्यां...