तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
आषाढी पौर्णिमा :- शाक्यमुनी भगवान, सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस महत्त्वाच्या चार घटना . पहिली घटना:-"राणी महामायेचे स्वप्न"
आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते, राणीने या स्वप्नात पाहिले की, चारही दिशेने दूत येतात राणीचा शाही पलंग उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शाल वनाजवळ अनोतवदह नावाच्या सरोवरावर नेतात व सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षाखाली ठेवतात सर्वांगास सुगंधी लेप लावून राणीला स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात, राणीस सुगंधी फुलांनी सजवितात, काहीवेळाने सहा दातांचा शुभ्र गजरात येतो त्याने आपल्या सोंडेने श्वेत कमल पुष्पाची माळ धारण केलेली असते. राणीच्या शयये भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो ,नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते राजाला सांगितले तेव्हा त्यांनी स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शंम्म ,ध्वज लख्यण, मंत्री, कोडज ,भोज,सुयाम व सुदत्त आठ स्वप्न शास्त्रज्ञांना दरबारात बोलून घेतले त्यांना सविस्तर वृत्तांत कथन करून या स्वप्न शास्त्रींना राणीच्या स्वप्नाचा अर्थ विचारण्यात आला सर्व ऐकून झाल्यावर त्यापैकी जो सर्वात वृद्ध शास्त्री होता त्याने राजास या स्वप्नाचा अर्थ सांगितला तो म्हणाला; राजन् !आपण स्वप्ना संबंधी कसलाही चिंता करू नये , हे स्वप्न फारच सुखद असून याचा परिणाम शुभ व मंगलमय आहे .आपल्या घरी एक राजपुत्र लवकरच जन्मास येणार आहे ."या स्वप्नाच्या द्वारे राणीला आषाढी पौर्णिमेच्या शुभ घडी गर्भधारणा झालेली आहे"',म्हणूनच या पौर्णिमेस गर्भमंगल दिन म्हणतात.. जगभरातील बौद्ध हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दुसरी घटना:- गौतमाचा गृहत्याग ,
कपिलवस्तु च्या शेजारी रामग्रामचे कोलीय राज्य होते या दोन राज्यांमधून रोहिणी नावाची नदी वाहत असे, रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोघेही आपापल्या शेतीकरीता वापरीत, नदीचे पाणी प्रथम कोणी ?घ्यावे व किती? घ्यावे याबद्दल शेती हंगामात त्यांचा वाद होत असे, हा वाद कायमचा मिटवावयचा असेल तर युद्धाने मिटवावा असा निर्णय शाक्य संघाने आमसभेत घेतला, याच आमसभेत "संघाच्या या निर्णयास माझा विरोध आहे ",असे घोषित करून गौतम म्हणाला' युद्धाने हा प्रश्न न सोडवता दोन्ही बाजूकडील दोन दोन प्रतिनिधी निवडून घ्यावेत आणि त्यांनी पाचवा प्रतिनिधी निवडावा व पंचांनी सामंजस्याने हा प्रश्न निकाली काढावा असे मत त्यांनी मांडले, गौतमाचे हे मत म्हणजे शाक्य संघाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान होते. जो कोणी संघाच्या निर्णयाविरुद्ध वागतो व संघाचा आदेश मोडतो त्यास संघशासन केल्याशिवाय सोडत नसे संघाच्या शिक्षेची अंमलबजावणी निमूटपणे करणे हे संघाच्या प्रत्येक सभासदाचे आद्यकर्तव्य असे. संघाचा आदेश गौतमाने मोडला म्हणून त्यास शिक्षा देणे हे ओघानेच आले, शिक्षेचे तीन पर्याय संघाने गौतमा समोर ठेवले..
१) सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे .
२) देहांत शासन स्वीकारणे अथवा देशत्याग करणे.
३) कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती व सामाजिक बहिष्कार.
यापैकी पहिला पर्याय गौतमास मान्य होणे कदापि शक्य नव्हते कारण त्याच्या विचारातच युद्धविरोधी भूमिका ठासून भरलेली होती. तिसरा पर्याय समानता कारण या निर्णयात कुटुंबाचा काहीही दोष नव्हता, म्हणून दुसरा पर्याय लागू होता, त्यातील पहिली शिक्षा सिद्धार्थ गौतमास मान्य नव्हती, कारण देहदंड त्यास दिला जातो जेव्हा एखाद्याने देश्द्रोहासाराखा गंभीर अपराध करतो ,तेव्हा देहदंडाचा प्रश्नच उद्भवला नाही पर्यायाने देशत्यागाचा पर्याय स्वीकारण्यास स्वखुषीने मी केव्हाही तयार आहे असे सिद्धार्थाने संघास सांगून टाकले .
कोलीयांशी युद्ध करण्याचा शाक्य संघाने घेतलेला निर्णयास विरोध केल्यामुळे आपला आवडता घोडा "कथक" यावर आरूढ होऊन आपला प्रिय सेवक छन्न यास सोबत घेऊन त्याने कपिल वस्तूचा निरोप घेतला तो दिवस आषाढी पौर्णिमेचा होता त्यावेळी गौतमाचे वय 29 वर्षाचे होते या गृह त्यागाच्या घटनेस गौतमाचे" महाभिनिष्क्रमण' असे म्हणतात..
तिसरी घटना:- पंचमवर्गीय भिक्खूची दीक्षा,
भगवंताना संबोधी प्राप्त झाल्यानंतर तो भिक्खू कोणास सांगावा किंवा कसे? असा प्रश्न भगवंतास पडला ,संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की, आत्मकल्याणापुरता सीमित ठेवावा असा विचार ते करू लागले, यालाच बुद्धाचा विषादयोग असे म्हणतात.तथागताने विचार केला सर्व जगास शांती प्राप्त व्हावी दुःखातून सर्वांची मुक्तता व्हावी हे जर आवश्यक आहे तेव्हा धम्माचा इतरास उपदेश केलाच पाहिजे असा विचार करून आपणास प्राप्त झालेल्या ज्ञानाचा इतरांना धम्मोदेशाद्वारे तो देण्याचा निश्चय तथागतांनी पक्का केला ,सर्वप्रथम हा धम्म कोणाला द्यावा ?त्यांना सर्वप्रथम आलारकालाम यांची आठवण झाली तथागतांच्या मते तो विद्वान ,शहाणा, बुद्धिमान होता परंतु आलारकालाम मृत्यू पावलांचे त्यांना समजले, त्यानंतर उद्द्क राम्पुत्ताला धम्मोपदेश देण्याचा विचार त्यांनी केला परंतु तोही मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले.निरंजना नदीच्याकाठी सिद्धार्थ गौतमाच्या तपश्चर्येच्या कालावधीत त्यांच्याबरोबर होते परंतु सुजाताच्या खीर ग्रहणा नंतर गौतमाने तपश्चर्या व त्याचा त्याग केला त्यामुळे ते रागावून निघून गेले होते . त्यांना हा सत धम्म सर्वप्रथम सांगावा हा विचार करून तथागताने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजले ते हल्ली वाराणसीत आहेत, त्यांची भेट घेण्यासाठी भगवान वाराणसी येथील सारणात जवळ मृगदाय वनात गेले लांबूनच त्या पंचम वर्गीय भिक्खूंनी पाहिले , त्याचा गौतामावरील राग अजून पुरता गेलेले नव्हाता ,परंतु भगवंताचे व्यक्तीमत्व इतके प्रभावी होते की त्याने प्रभावित होऊन ते गौतामाकडे आकर्षित झाले ,गौतमाचे सत्कार न करण्याचा निश्चय असा गळून पडला ,जसा वाऱ्याच्या झोताने पिकलेला आंबा झाडावरून गळून पडावा ,व भगवंतास त्यानी धम्म दीक्षा देण्याची विनंती केली ,बोधि प्राप्तीनंतर तथागतांचे हे पहिले धम्मचक्र प्रवर्तन होय . ज्या स्थळी हे पवित्र धम्मचक्र प्रवर्तन घडून आले ते स्थान म्हणजे सारनाथ येथील ऋषीपतन "मृगदाय वन" हे होय . असे म्हणतात त्रिसरणा तील प्रथम सूत्त :- बुद्धम् शरणम् गच्छामि हे बुद्धगया मध्ये जन्मले ,तर उर्वरित दोन सुत्त धम्मम शरणम गच्छामि, संगम शरणम गच्छामि हे सारंनात तिथे जन्मास आले .यावरून बौद्ध संस्कृती मधील सारनाथ चे महत्त्व लक्षात येते ज्यादिवशी तथागतांनी या पंचम वर्गीय भिक्खूंना धम्मदीक्षा देऊन प्रवर्तित केले तो पवित्र दिवस होता आषाढी पौर्णिमा आणि पंचम वर्गीय भिक्कुची ची नावे होती :- कौडिण्य,अश्वजित ,कश्यप ,महानाम आणि भद्रिक . धम्मचक्रप्रवर्तन करतेवेळी तथागतांनी कथन केलेल्या मार्गाला विशुद्धीमग्ग किंवा पावनपथ असे म्हणतात ..
चौथी घटना :-वर्षावास,
पावसाळ्यात कोण्या एका विहारात राहून धम्म उपदेश करणे यासच वर्षावास असे म्हणतात , संघातील भिक्कूनी धम्माची शिकवण देता देता भिक्षा मागून चरितार्थ चालवावा असा दंडक होता ,दोन भीक्कूणी एकत्र न फिरता अलग-अलग दिशेने धम्मप्रचार करावयाचा व एका गावी दोन दिवसांपेक्षा अधिक मुक्काम करावयाचा नाही असा नियम तथागतांनी संघासाठी घालून दिलेला होता, पावसाळ्याच्या तीन महिन्याच्या कालावधीत मात्र कोण्या एका मध्यवर्ती शहराच्या बुद्ध विहारात मुक्कामी रहावे व धम्मदेसना करावयाचा प्रघात धम्मात आहे, याचं पावसाळ्यातील मुक्काम म्हणजे वर्षावास... भगवंतांनी पंचमवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मदीक्षा सारनाथ येथील वृदांवनात दिली तो कालावधी पावसाळ्याचाच होता तेव्हा तथागतांनी साजरा केलेला वर्षावास भगवंताचा व बौद्ध धम्माचा प्रथम वर्षावास या नावाने ओळखला जातो वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते तर त्याची सांगता अश्विन पौर्णिमेस होते भगवंतांनी साजरा केलेल्या वर्षावासाचा प्रथम दिवस आषाढी पौर्णिमा होता..
!!मंगल हो!!
टिप्पण्या