पारमिता ह्या शील मार्ग आहे .. Dahā pāramitā baud'dhism
#10 PARAMITA IN BUDDHISM
१) शील (1 PARAMITA IN BUDDHISM)
शील म्हणजे नीतिमत्ता,
वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
आपण दानधर्म पुष्कळ केला; किंबहुना आपला प्राणहि लोककल्याणासाठीं
देण्यास तयार झाला; पण आपले शील निर्मळ नसलें, तर सन्मार्गांत
तुमची उन्नति होणार नाहीं. प्राणघातापासून अलिप्त राहणें, खोट्या
मार्गानें पैसा न कमावणें, मद्यपानादिक व्यसनापासून दूर
राहणें व योग्यकाळापर्यंत ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमांत एकपत्नीव्रत पाळणें
ह्याला शील म्हणतात.दानधर्म करणें चांगलें; परंतु त्यायोगें आपले
शील मलिन होत असलें, तर तो न केलेला बरा. लबाडीनें पैसा
मिळवून किंवा चोरी करून मोठा दानधर्म करण्यापेक्षां शील परिशुद्ध ठेवून दिलेला पैसा
अधिक श्रेयस्कर आहे
२) दान (२ PARAMITA IN BUDDHISM)
स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी
स्वतःची मालमत्ता, रक्त,
देह अर्पण करणे. प्रथमतः तुम्ही
गोरगरीबांना व आंधळ्यां पांगळ्यांना दानधर्म करा. दानानें तुमच्या मनांत कोमल दया
उत्पन्न होऊन आपली उन्नति करील व आपणास बोधिमार्गाच्या पहिल्या पायरीजवळ आणील.
लहानपणापासून दानधर्माचा अभ्यास केल्यास तशा प्रसंगी लोककार्याला आपला देह
देण्यासहि तुम्हास परवा वाटावयाची नाही.
३) उपेक्षा 3 PARAMITA IN BUDDHISM
निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
एकान्तवासाच्या योगें आपण ज्ञान
मिळविण्यास समर्थ झालें पाहिजे. लोकोपयोगी ज्ञान मिळवून तें पूर्णत्वाला नेणें
यालाच प्रज्ञापारमिता म्हणतात. तुमच्या वाचनांत येणार्या पुस्तकांत आणि तुमच्या
रोजच्या व्यवसायांत पुष्कळ ज्ञान भरलेलें आहे. पण तें कसें ग्रहण करावें हें जर
तुम्हास माहीत नसलें तर त्यापासून फायदा न होतां नुकसान होणार,
व तें तुमच्या घाताला कारण होणार. पैशाच्या लोभानें जे ज्ञान संपादन
करतात, ते एक तर आजन्म असंतुष्टाणें काळ कंठीत असतात;
अथवा लबाडीनें आणि चोरीनें पैसा कमावण्यास शिकून आपला सर्वस्वीं घात
करून घेतात. अशा लोकांच्या ज्ञानाला प्रज्ञा म्हणत नाहींत, प्रज्ञा म्हणजे लोककल्याणाची तीव्र अपेक्षा धरून मिळविलेलें सात्त्विक
ज्ञान. आणि तें मिळविण्यास तुम्हाला लहानपणापासूनच शिकलेंपाहिजे,तथागतांनी
सांगितलेल्या आर्य अष्ठांगीक मार्गावर जीवन जगता आले पाहिजे .
४) नैष्क्रिम्य 4 PARAMITA IN BUDDHISM
ऐहिक सुखाचा त्याग करणे. आपले शील परिपूर्ण होण्यासाठीं तुम्हास एकान्ताची
गोडी लागली पाहिजे. एकान्तवासांत बसून प्रथमतः तुमचें शरीर किती अपवित्र
पदार्थांनीं भरलें आहे हें पाहण्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. खाटकाच्या
दुकानांत टांगलेले मांसाचे तुकडे, एका बाजूला पडलेली
आंतडी, स्मशानांत पडलेलीं माणसांची हाडें पाहून तुम्ही
कंटाळतां. पण हे सर्व पदार्थ आपल्या ह्या अमंगल शरीरांतच आहेत ह्याची आपल्याला जाणीव
आहे काय ? जर नाहीं, तर ती करून
घेण्याचा तुम्ही सतत प्रयत्न केला पाहिजे. जेथें जेथें मांस, आंतडीं आणि हाडें तुम्हास पाहावयास सांपडतील, तेथें
तेथें तीं नीट रीतीनें पाहून हेच पदार्थ आपल्या देहांत आहेत ह्याचे ध्यान केलें
पाहिजे; हे आंतील पदार्थ तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिले
पाहिजेत.
ह्या ध्यानानें शरीराचा वीट येणें संभवनीय
आहे.
५) वीर्य 5 PARAMITA IN BUDDHISM
हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व
सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
६) शांती 6 PARAMITA IN BUDDHISM
शांति म्हणजे
क्षमाशीलता, द्वेषाने
द्वेषाला उत्तर न देणे. उत्साहाबरोबरच क्षमेचा
अभ्यास केला नाहीं तर त्याचें त्वरित क्रोधांत परिवर्तन होईल,
व त्यायोगें आपणास अत्यंत दुःख भोगावें लागेल. कित्येकांना क्रोध
आणि उत्साह एकच आहेत असे वाटतें. परंतु तो त्यांचा भ्रम आहे. शूराला कधीं क्रोध
येत नसतो, त्याच्या आंगचा उत्साह क्रोधाला तेव्हांच दाबून
टाकतो. जो क्रोधाला वश होतो, त्याला शूर म्हणतां यावयाचें
नाहीं; कारण शूर अशा दुष्ट मनोविकाराच्या स्वाधीन कसा होईल ?
म्हणून खरें शौर्य संपादण्यासाठीं तुम्ही क्षान्तीचा अभ्यास केला
पाहिजे ? जर कोणी मूर्खपणानें आपला अपराध केला तर त्याच्यावर
रागवण्यानें त्याहिपेक्षां अधिक मूर्खपणा आपण केला असें होईल. म्हणून अशा प्रसंगीं
शान्तपणें त्या माणसाचा दोष आपण दाखवून द्यावा; पण त्यावर
कधींहि रागावूं नये, किंवा त्याचा द्वेष करूं नये. राग आपोआप
येत असतो; पण क्षमा प्रयत्नानें संपादावी लागते. तिचा
तुम्ही लहानपणापासून अभ्यास केला नाहीं तर पुढेंआपणास सत्कार्यांत यश येणें फार कठीण होईल.
७) सत्य 7 PARAMITA IN BUDDHISM
सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
आपण सत्यपारमितेचा सतत अभ्यास केला पाहिजे;
वाटेल तो प्रसंग येवो सत्याला सोडून तिळमात्रहि इकडेतिकडे जाणार
नाहीं, असा निश्चय केला पाहिजे. माणसानें एक सत्य सोडलें तर
इतर शील सांभाळण्यास तो कधींहि समर्थ व्हावयाचा नाहीं; एकान्तवासांत
त्यास सुख व्हावयाचें नाहीं; त्याचा उत्साह लोकांना
ठकविण्याकामीं खर्च होणार, सत्यानेंअधिष्ठानपारमिताअधिष्ठान
म्हणजे दृढनिश्चय, आणि त्यांत पारंगतता संपादणें याला
अधिष्ठानपारमिता म्हणतात. आपण अमुक वेळी अमुक काम करण्याचा निश्चय करतों, आणि आळसामुळें किंवा गप्पागोष्टींच्या आवडीमुळें तो मोडतों. आपला बेत
वेळोवेळीं मोडण्याची सवय अंगवळणी पडली म्हणजे मनुष्य पूर्णपणें अव्यवस्थित होतो,
व त्याच्या हातून कोणतेंहि काम पार पाडणें मुष्कील होतें. असा मनष्य
आत्मोन्नति करून जगाचें कल्याण कसें साधू शकेल ? म्हणून लहान
सहान कार्यांतहि आपले बेत तंतोतंत
पाळण्याचाआपण अभ्यास केला पाहिजे.
८) अधिष्ठान 8 PARAMITA IN BUDDHISM
ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
९) करुणा 9 PARAMITA IN
BUDDHISM
मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता. दुसऱ्या प्राण्याचा दुःखहार करण्यात जो आनंद येतो तोच खूप आहे.
आपल्याच मोक्षाचा विचार करणे हे निरस आहे. अशा व्यक्तीगत 'समाधी' या रत्नाचा महायानाने त्याग करून 'करुणा' हे नवे रत्न त्रिरत्नात स्वीकारले.
१०) मैत्री 10 PARAMITA IN BUDDHISM
मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे
तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे
दहा गुण सर्व प्राण्यांत
आहेतच. परंतु त्यांचा जे विकास करतात, तेच बोधिसत्त्व होतात. मुलांनो, ह्या गुणांचा विकास
करून ह्याच जन्मीं तुम्हाला बोधिसत्त्व होतां येणें शक्य आहे; अनेक प्राण्यांचे जन्म घेण्याची गरज नाहीं. तेव्हां अशा सद्गुणांची तुम्ही
हेळसांड न करितां ह्या पारमिता संपादण्याचा सतत प्रयत्न करावे .
!!मंगलहो!!
Dahā pāramitā baud'dhism

टिप्पण्या