मुख्य सामग्रीवर वगळा

'Dhammadut"

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...

#धम्मचक्र

बाबासाहेबांनी धर्मांतर करण्यासाठी नागपूरची निवड कोणत्या करणामुळे केली?

 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यांनी रक्ताचा एक थेंबही न सांडता मोठी धम्म क्रांती घडवून आणल्याचा उल्लेख नेहमी केला जातो. अशोक विजयादशमी हा दिवस धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणूनच ओळखला जातो. दरवर्षी या दिवशी लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. परंतु, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी नागपूरची निवड का केली? यामागं नेमकं कारण काय आहे?

 बाबासाहेबांची घोषणा आणि बौद्ध धम्माचा स्वीकार

हिंदू धर्मात दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यामुळेच त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 मध्ये येवला येथे धर्मांतराची घोषणा केली. "मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही," असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर विविध धर्मांचा अभ्यास करून त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. 1956 पर्यंत धर्मांतर कधी व कुठे होणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती.

 नागपूरचे नाव ठरलेच नव्हते -
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ठिकाणासाठी विविध नावं पुढे आली. विशेष म्हणजे यामध्ये सुरुवातील नागपूर नव्हतेच. तर वाराणसी येथील सारनथ हे ठिकाण सुरुवातीला चर्चेत होते. याच ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश केला आणि भिक्षूसंघ स्थापन केला. त्यामुळे या हे ठिकाण अनेकांनी सुचविले होते. त्यानंतर अनेक पर्याय पुढे आले. शेवटी मंबई हे ठिकाण निश्चित होत आले होते.

 वामनराव गोडबोले यांचा पुढाकार -
 बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी मुंबई या ठिकाणाला सर्वाधिक पसंती होती. परंतु, धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी नागपूरचे नाव सुचविले तसेच त्यामागचा उद्देशही स्पष्ट केला. गोडबोले यांच्या आग्रहामुळे पुढे नागपूर हे ठिकाण निश्चित झाले. विशेष म्हणजे धम्मचक्र परिवर्तनाच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी गोडबोले यांनी स्वीकारली. तसेच नागपुरातील तत्कालीन बौध्दजण समितीने या सोहळ्याचा संपूर्ण खर्च आणि जवाबदारी घेतली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर हेच ठिकाण बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यासाठी सुनिश्चित केले.
 नागपूर नागवंशीयांची राजधानी - धर्मपरिवर्तनासाठी नागपूरची निवड करण्यास काही प्रमुख कारणे होती. यामध्ये पूर्वी नागपूर ही नागवंशीयांची राजधानी होती. नागवंशीय लोक हे पूर्वाश्रमीचे बौद्ध मानले जातात. त्यामुळे नागपुरात धम्मदीक्षा समारंभ झाल्यास मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील, असे गोडबोले यांचे मत होते. तसेच नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्याने दळणवळणाच्या दृष्टीनेही सोयीचे ठिकाण होते.
लाखो अनुयायांसह बाबासाहेब बौद्ध धम्मात - पूर्वनियोजनानुसार 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजयादशमी दिनी नागपुरातील अंबाझरी रोडवर दीक्षाभूमी येथे भव्य मंडप घालण्यात आला. सकाळी 9.30 च्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षा विधी पूज्य भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांनी केला. पुनः त्याच मंडपात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 5 लाखापेक्षा अधिक बांधवाना 22 धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा दिली, अशी माहिती बुद्धिस्ट कौन्सिल ट्रस्टचे चंद्रशेखर गोडबोले यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तथागताच्या जीवनात आषाढीपौर्णिमेस घडलेल्या महत्त्वाच्या घटना"

आषाढी पौर्णिमा :-  शाक्यमुनी भगवान, सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस महत्त्वाच्या चार घटना .                           पहिली घटना:-"राणी महामायेचे स्वप्न"  आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते, राणीने या स्वप्नात पाहिले की, चारही दिशेने दूत येतात राणीचा शाही पलंग  उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शाल वनाजवळ अनोतवदह नावाच्या सरोवरावर नेतात व सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षाखाली ठेवतात सर्वांगास सुगंधी लेप लावून राणीला स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात, राणीस सुगंधी फुलांनी सजवितात, काहीवेळाने सहा दातांचा शुभ्र गजरात येतो त्याने आपल्या सोंडेने श्वेत कमल पुष्पाची माळ धारण केलेली असते. राणीच्या शयये भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो ,नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते राजाला सांगितले तेव्हा त्...

"तथागत बुद्धांच्या जीवनात श्रावण पौर्णिमेचे महत्व"

  #अंगुलीमालाची दीक्षा श्रावण पौर्णिमा इ .स पु .,५०४ १)सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना , एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर  होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न के...

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...