तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
माघ पौर्णिमा
माघ पौर्णिमेला पाली भाषेत 'माघ मासो' म्हणतात. ही पौर्णिमा साधारणत:फेब्रुवारी महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या. पहिली घटना-बुद्धांची महापरिनिब्बाणाची घोषणा
माघ पौर्णिमेच्या दिवशी वैशाली या ठिकाण तथागत गौतम बुद्धांनी "आजपासून तीन महिन्यानंतर अर्थात वैशाख पोर्णिमेला महापरिनिर्वाण प्राप्त करतील" अशी घोषणा केली. तो दिवस इ. स. पुर्व ४८४ माघ पोर्णिमेचा होता.
दुसरी घटना - वैशालीचे अंतिम दर्शन.
तथागत भगवान बुद्ध आपल्या महापरिनिर्वाणाच्या घोषणेच्या दुसर्या दिवशी वैशाली नगरीत आपल्या अंतीम यात्रेसाठी गेले. यात्रा समाप्त करून त्यांनी नगरीच्या बाहेर निघताना फिरून वैशालीकडे पाहीले व म्हणाले "आनंद, हे माझे वैशालीचे अंतीम दर्शन आहे." तथागतांचे तीन महिन्यानंतर होणार्या महापरिनिर्वाणाची वार्ता वैशालीवाशीयांपर्यंत पोचल्याने वैशालीचे सर्व लिच्छवी जनता दु:खी अंतःकरणाने भगवान बुद्धांच्या मागे मागे शहराच्या बाहेर पर्यंत आले. भगवान बुद्धांनी मागे येण्यासही मनाई केली असता ते त्यांचे ऐकत नव्हते. त्यांची ही श्रद्धा पाहून आपलीही स्नेह व आशीर्वादाच्या रूपाने काहीतरी आठवण वैशालीवासीयांकडे असावी म्हणून आपले भिक्षापात्र तथागतांनी लिच्छवी लोकांना दानस्वरूप भेट दिले.
लिच्छवी लोकांनी या भिक्षापात्राच्या दानाची घटना तथागताच्या प्रती त्यांची श्रद्धा म्हणून एका शिलास्तंभावर लिहून या ऐतिहासिक घटनेला अमर केले.
तिसरी घटना :- श्रावक आनंद यांचे परिनिर्वाण.
भगवान बुद्धांचा प्रिय शिष्य आनंदच्या जीवनातील ऐतिहासिक घटना ही भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणा प्रमाणेच आहे. स्थविर आनंदला आपल्या परिनिर्वाणाची चाहुल लागली. मगध सम्राट अजातशत्रूची राजधानी राजगीर येथे स्थविर आनंद यांनी जाहीर केले की, "माझे महापरिनिर्वाण लवकरच होणार आहे." त्यांची इच्छा होती की त्यांचे निर्वाण वैशालीमध्ये व्हावे. म्हणून त्यांनी राजगृहापासुन वैशालीकडे प्रस्तान केले. स्थविर आनंद यांच्या निर्वाणाची घोषणा व निर्वाणाचा वैशालीचा निर्णयाची वार्ता अजातशत्रू पर्यंत पोहचली. जर आनंदला निर्वाण प्राप्त करायचा आहे तर तो माझ्या राजधानीत म्हणजेच राजगृहच होवो असा त्यांची इच्छा होती. त्यामुळे तो आपल्या सर्व मंत्र्यांसह स्थविर आनंद यांना परत राजधानीत आणण्यासाठी स्थविर आनंद यांच्या पाठीमागे निघाला . त्यांच्या शोध करता करता तो त्यांच्या राज्याची सीमा जिथे संपते आणि वैशाालीची सीमा जेथे सुरू होते अशा मध्यभागी आला. या सीमारेषेवर गंडकी नावाची नदी वाहत होती. जोपर्यंत अजातशत्रू आनंदला परत नेण्यासाठी पोहचला तोपर्यंत आनंद गंडकी नदीच्या पात्रापर्यंत पायी चालत पोहचले होते. आनंदच्या निर्वानाची घोषणा वैशालीच्या लिच्छवीं पर्यंत पोहचली होती त्यामुळे त्या नगरातील जनता त्यांना घेण्यासाठी वैशालीच्या सीमेपर्यंत म्हणजेच गंडकी नदीच्या तीरावर पोहचले होते. श्रमन आनंदच्या समोर मोठे धर्मसंकट उभे राहिले कोना एकाकडे जाणे निवडले तर दुसरा दु:खी होईल या मुळे त्यांनी मध्यम मार्गाची निवड करून गंडकी नदीच्या मध्यभागात नदीच्या मध्य पात्रात समाधी त्रेताग्री द्वारा निर्वाण प्राप्त केले. त्यानंतर मगध नरेश अजातशत्रू व लिच्छवींगण यांनी स्थविर आनंद यांचा अंत्यविधी गंडकी नदीच्या किनार्यावर संपन्न केला.तो दिवस माघ पौर्णिमेचा होता. त्यानंतर स्थविर आनंद यांच्या अस्थीअवशेषांना दोन्हीकडील अनुयायांना समान वाटून घेतल्या. दोघांनीही हे अस्थी आपल्या राज्यात नेऊन त्यांवर स्तुप निर्माण केले. यालाच आनंदचे अर्धांग अवशेष संबोधले जाते.
चौथी घटना :- विहाराचा शोध.
सध्याच्या बिहार राज्यात म्हणजेच वैशाली नगरीत माघ पौर्णिमेच्या दिवशीच भगवान बुद्धांच्या धातू अवशेषांवर निर्माण केल्या गेलेल्या स्तुपाचा शोध लागला.
अशा या माघ पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा
टिप्पण्या