“आनापानस्मृतिभावना”
मज्झिमनिकायांत आनापानसति नावाचे एक स्वतंत्र
सुत्त आहे. संयुत्तनिकायात
आनापानसंयुत्त
नावाचे
एक मोठे प्रकरण आहे, आणि
इतर निकायांतूनही या आनापानस्मृतीचा अनेक ठिकाणी
उल्लेख आला आहे. त्या सर्वांवरून बुद्धसमकाली आणि त्यानंतर काही
काळपर्यंत हे कर्मस्थानप्रधानभूत गणले जात होते यात शंका नाही. म्हणून याच
कर्मस्थानाचा येथे प्रथमतः विचार करण्यात येत मज्झिमनिकाय, महासकुलवायिसुत्त
, आणि अंगुत्तरनिकाथ, एककनिपात व दसकनिपात
यांत यांचा उल्लेख आढळतो.
“आन म्हणजे आश्वास व अपमान म्हणजे प्रश्वास ह्यांच्या स्मृतीला
आनापानस्मृति म्हणतात”.
आनापानसतिसुत्तांत बुद्ध
भगवान् म्हणतो, ''भिक्षुहो, एखादा
भिक्षु अरण्यात, झाडाखाली किंवा एकांतस्थळी जाऊन देह सरळ
ठेवून मोठ्या सावधगिरीने बसतो. तो सावधानपणे आश्वास घेतो वसावधानपणे प्रश्वास
सोडतो. दीर्घ
आश्वास घेत आहे असे जाणतो; दीर्घ प्रश्वास सोडीत
असला तर
दीर्घ प्रश्वास सोडीत आहे असे जाणतो;
र्हस्व आश्वास घेत असला तर र्हस्व
आश्वास घेत आहे असे जाणतो; र्हस्व प्रश्वास सोडीत असला तर र्हस्व प्रश्वास
सोडीत
आहे असे जाणतो; सर्व देहाची स्मृती ठेवून आश्वास करण्याचा व
प्रश्वास करण्याचा अभ्यास
करतो; कायसंस्कार शांत करून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा
अभ्यास करतो.
प्रीतीचा
अनुभव घेऊन आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो;
चित्तसंस्कार जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा
अभ्यास करतो; चित्तसंस्कार
शांत करून
आश्वास
प्रश्वासकरण्याचा अभ्यास करतो.चित्त जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो;
चित्ताला प्रमुदित करून आश्वास प्रश्वास
करण्याचा अभ्यास करतो; चित्ताचे
समाधान करून
आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो. चित्तालां विमुक्त करून आश्वास प्रश्वास करण्याचा
अभ्यास करतो. अनित्यता जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास
करतो; वैराग्य जाणून
आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; निरोध जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा
अभ्यास करतो;
त्याग जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.भिक्षुहो,
याप्रमाणे
आनापानस्मृतीची भावना केली असता ती महत्फलदायक
आणि महद्धितकारक होते.''
पहिल्या प्रथम
सावधानपणे आश्वास घेणे व प्रश्वास सोडणे याचे विधान आहे. आणि हेच काम
फार कठीण जाते. श्वासोच्छवासांवर मन ठेवण्याचा प्रयत्न
केल्याबरोबर ते इकडे तिकडे
धावावयास लागते. त्याच्याबरोबरच अश्वासप्रश्वासांचेही अवलोकन
करावयाचे असते.
अशा रीतीने
ध्यानाला सुरुवात केलीअसता काही विपरीत पदार्थ डोळ्यांसमोर येऊ लागले,
तर योग्याचे चित्त अद्यापि रुग्णावस्थेत आहे, असे समजले जाते; व त्याच्या
मनात वर सांगितलेल्या निवरणांपैकी
कोणत्या निवरणाचा प्रादुर्भाव आहे, हे विचारून घेऊन, त्याचा
प्रतीकार कोणत्या भावनेने करावा,
हे सांगण्यात येते.
अशा रीतीने चित्तदोषांचे दमन करून शांतपणे आणि
निर्भयपणे अश्वासप्रश्वासांवर चित्त
आणले
असता डोळ्यांसमोर समाधीला साधक पदार्थ दिसू लागतात. एखाद्याला रम्य
वनप्रदेश दिसतो, तर दुसर्याला एखादी उत्तम नदी वाहात आहे असा भास
होतो.
इतरांना कमळे सूर्यमंडल चंद्रमंडल किंवा असेच
कामविकारविरहित रम्य देखावे दिसू लागतात.
परंतु त्यात आसक्त न होता अश्वासप्रश्वासांवर
ध्यान करण्याचा प्रयत्न त्याने तसाच चालू ठेवला पाहिजे. सावधानपणें अश्वास
प्रश्वास कसे करता येतात याचे विवरण या सूत्रात ज्या
चार
चौकड्या आहेत त्यापैकी पहिल्या चौकडीत केले आहे.
त्यात दीर्घ
अश्वास आणि दीर्घप्रश्वास म्हणजे लांब अश्वास व लांब प्रश्वास,
किंवा अधिक काळ टिकणारा आश्वास प्रश्वास;
आणि र्हस्व
अश्वास प्रश्वास म्हणजे कमी काळ टिकणारा आश्वास प्रश्वास. अर्थात हे
परस्पररावलंबी आहेत. धावणार्या मनुष्याचे अश्वासप्रश्वास फार दीर्घ
चालतात;
पण तोच जर उभा राहिला, तर ते हळू हळू र्हस्व होत जातात. दमून येऊन उभा राहिलेल्या
माणसापेक्षा शांतपणे बसलेल्या माणसाचे
अश्वासप्रश्वास र्हस्व असतात.
बहुधा ध्यानारंभी
अभ्यासप्रश्वास दीर्घ असतात, आणि मग हळूहळू र्हस्व होत जातात. म्हणून प्रथमतः दीर्घ
आणि मग र्हस्व या विशेषणांचा उपयोग करण्यात आला
आहे. या
आश्वासप्रश्वासांचे एकदा
आकलन
झाले, म्हणजे आपल्या सर्व देहाची
स्मृती ठेवून अश्वासप्रश्वास करण्याचा अभ्यास
करावा लागतो. तो जर साध्य झाला, तर सर्व शरीरावर एक प्रकारच्या आनंदलहरी उठू
लागतात, व
त्यायोगे शरीर कंपित होते आहे असे वाटू लागते. पण असे सुखकारक कार्यसंस्कारही प्रशांत करून अश्वास
प्रश्वास करावयाचा असतो.
अनापानस्मृतिभावनेचा सर्वात मोठा फायदा हा की, तिचा अल्पाभ्यासहि हितकारक होत
असतो;
तिच्यामुळे हानी होण्याचा मुळीच संभव नसतो. पहिल्या चौकडीचा तेवढा अभ्यास
पूर्ण झाला असे जरी धरले, तरी त्याचा व्यवहारात वारंवार चांगला उपयोग होतो.
ज्या ज्या वेळी आपले मन कामक्रोधादिक
मनोवृत्तींनी बहकले जाते, भयाने
किंवा कुशंकेने
व्यग्र होते,
त्या त्या वेळी प्राणापानाचे आलंबन मिळाल्यामुळे ते एकदम ताळ्यावर
येते.
अंधार्या रात्री खाचखळग्यांतून जात असता जसा
काठीचा आपणास उपयोग होतो, तसा
प्रपंचात चित्ताला या आलंबनाचा उपयोग होत असतो. मेसिडोनियाच्या फिलिप बादशाहाने
आपण
बहकून जाऊ नये म्हणून आपणाला स्मरण देण्यासाठी एक मनुष्य ठेवला होता; व तो
'फिलिप, तू मनुष्य आहेस,
तू मनुष्य आहे, असे वारंवार म्हणत असे. परंतु प्रत्येक माणसाला
अशा
रीतीने आपणाला स्मरण देण्यासाठी दुसरा मनुष्य ठेवता येणे शक्य नाही; आणि
आनापानस्मृतीची भावना केली असता त्याची गरजही
नाही. उच्छृंखल
मनाला आवरण्याचे
काम आनापानस्मृति आपोआपच करीत असते.
!!मंगल हो !!
@बालस्नेही
टिप्पण्या