#विपस्सना
रूप भिक्खवे अनिच्चं ... वेदना अनिच्चा...सञ्ञा अनिच्चा...संखारा अनिच्चा...विञ्ञाणं अनिच्चं ।यदनिच्चं तं दुक्खं, यं दुक्खं तदनत्ता, यदनत्ता तं नेतं मम, नेसो हमस्मि,न मेसो अत्ता ति ॥ एहवमेतं यथाभूतं सुभ्मप्पञ्ञाय दट्ठव्बं ॥
धरणीकंपादिकाच्यायोगाने पृथ्वीच्या स्थिर भागातहि भयंकर अदलाबदल होत असते.नद्यांचे जेथे स्त्रोत असेल तेथे वाळवंट बनते व नदीचा प्रवाह भलत्याच बाजूला वहातअसतो पण असे विलक्षण फेरफार सर्वांनाच पहावयास मिळत नसतात.त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर उगवणार्या आणि ज्यात पृथ्वीचाच अंश जास्त आहे,अशा- वनस्पतिवर्गाचे निरीक्षण करावे. पावसाळा सुरू झाल्यावर काही काळानेजिकडे तिकडे सर्व प्रदेश हिरवागार झालेला दिसतो. अश्विन महिन्याच्या सुमारालाधान्ये पिकास आल्याने शेते पिवळी दिसू लागतात. पण पुढे त्यांची कापणी होऊन धान्य गोळा केल्यावरकेवळ गवत शिल्लक रहाते. थंडीचे दिवस जाऊन वसंत ॠतूला सुरुवात होते न होते तो वृक्षाला पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतात, व सृष्टिमध्येएक अभिनव चैतन्य उत्पन्न झाल्यासारखे दिसते. इतक्यात उन्हाळा येतो, शेतेउद्ध्वस्त झाल्यासारखी दिसू लागतात, आणि दुपारच्या वेळी त्याकडे पाहिले असताडोळ्याला त्रास होतो. अशा रीतीने दृश्य सृष्टीत बाराही महिने सारखी घडामोडचाललेली असते. तिचा विचार करता करता जर आपण परमाणूपर्यंत जाऊन पोचलोतर त्यातहि अस्खलित क्रांति चालू असल्याचे आपणास दिसून येईल.आपोधातूचे फेरफार अधिक दृश्य आहेत. पावसाळ्याच्यापूर्वी नद्या वाळून गेल्या आहेत,तलाव कोरडे पडले आहेत, इतक्यात आकाशात अभ्र दिसू लागतात, मेघगर्जनेलासुरुवात होतो, वीजा चमकतात आणि पाऊस पडतो. नदीनाले आणि तलाव भरूनजातात, आणि जिकडेजिकडे पाणीच पाणी होऊन जाते. जी नदी काही दिवसापूर्वीअत्यंत शांत दिसत होती ती बेफामपणे वाहू लागते, मोठाला धोंडा टाकला तरी वाहूननेते, मग माणसाची गोष्ट काय ? पण पावसाळा संपल्या बरोबर ती पूर्वस्थितीवर येतेआणि हळूहळू आटत जाते. समुद्राला तर ओहोटीभरती रोजचीच असते, थोडासावारा वाहिल्याबरोबर लाटा येतात, आणि झंझावताने तुफान होते. एवढे कशाला ?नदी जरी आपणास एकच दिसत असली तरी तिच्यातील पाण्याच्या प्रत्येक परमाणूलात्यच्यामागून येणारा परमाणु समुद्राच्या बाजूला लोटीत असतो. तो समुद्रात पोचलातरी स्थिर रहात नाही, कारण समुद्रातील पाण्याचे परमाणु इतस्ततः सारखे धावतअसतात.तेजोधातूची अनित्यता याहूनहि स्पष्ट आहे.मोठाले जंगल जाळून टाकणारा अग्निहि ते संपल्यावर आपोआप विझून जातो.आकाशातील वीज, सूर्याची उष्णता, इत्यादिकांत वारंवार किती फेरफार होतातहे सर्वविश्रुतच आहे.वायुधातु याहिपेक्षा चंचल आहे. सकाळी हवा शांत असली तर संध्याकाळी अकस्मात जोरानेवाहू लागते व एखादे वेळेला तुफानहि होते, आणि पुन्हा एकाएकी तुफान नाहीसे होऊनसर्वत्र सामसूम होऊन जाते.बाह्यरुपस्कंधांत स्थूळ फेरफारांचे अवलोकन करून योग्याने क्रमाक्रमाने सूक्ष्मफेरफारांचे नीरिक्षण करण्यास शिकले पाहिजे आणि मग आपल्या देहातील रूपस्कंधकसा बदलत जातो या विचाराला लागले पाहिजे. मी मुलगा होतो तेव्हा किती उंच होतो,व त्यानंतर कसकसा वाढत गेलो व माझ्या शरीरात कोणकोणते फेरफार झाले, याचेत्याने मनन केले पाहिजे. याप्रमाणे सबाह्याभ्यंतरीच्या रूपस्कंधाची अनित्यता पूर्णपणेजाणल्यावर मग वेदनास्कंधाचा विचार करावा. आपण सकाळी मोठ्या आनंदात असतो,म्हणजे आपल्या वेदना सुखकारक असतात. त्याच संध्याकाळी आपण आजारी पडल्यामुळेकिंवा अशाच अन्य काही कारणांनी दुःखकारक होतात, आणि रात्री पुन्हा गाढ झोप लागलीम्हणजे उपेक्षाकारक होतात. म्हणजे सुख, दुख आणि उपेक्षा या तीन वेदनांचा अनुभवआपणास वारंवार येत असतो, आणि जितका जितका विचार करावा तितकी तितकी त्यांचीअनित्यता स्पष्टपणे आपल्या निदर्शनास येते.संज्ञा म्हणजे पदार्थमात्राची कल्पना. स्त्री, पुरुष, गाई, बैल, वृक्ष, वनस्पती यांमध्ये जोफरक दिसतो संज्ञेच्यायोगाने. एकाच जड सृष्टीचे अनेक पदार्थ बनलेले असता जिच्यामुळेत्यांचे आपण भिन्न स्वरूपाने आकलन करीत असतो, त्या मानसिक शक्तीला संज्ञा म्हणतात.वेदनास्कंध जसा अनित्य आहे, तसा संज्ञास्कंधही आहे. लहाणनणी निरनिराळी खेळणीकिंवा पतंग वगैरे पदार्थ यांची संज्ञा जशी आनंदकारक होते, तशी ती मोठेपणी होत नाही.तरुणपणी कादंबर्या किंवा असेच दुसरे वाङ्मय प्रिय असते, तसे ते वृद्धपणी नसते.आज आपण ज्याच्याकडे मित्रभावाने पहातो, त्यानेच आपला काही भयंकर अपराध केलातर पूर्वीची संज्ञा पालटून त्याच्याविषयी शत्रु संज्ञा, अथवा-आपण फारच सावधगिरीनेवागलो तर - मध्यस्थसंज्ञा उत्पन्न होते. अशा रीतीने प्रिय-अप्रिय संज्ञाचीवारंवार उलथापालथ होत असते. निर्भयपणे अनित्यतेची भावना केल्याबरोबर कोणत्याही पदार्थाला पकडून राहिल्यास दुःख होते हे आपण जाणतो. ज्या बाह्यसृष्टीत विलक्षण घडामोडी चाललेल्या आहेत, तिचाच एखादा भाग हा माझा बाग आहे, किंवा ही माझी शेतवाडी आहे, असे जो अज्ञ मनुष्य गृहीत धरून बसेल व त्यात आसक्त होऊन राहील, त्याला दुख होणे अगदी साहजिकच आहे. बागाची नासाडी झाली किंवा दुसर्या काही कारणाने तो त्याच्या हातून गेला, तर त्याला अतोनात दुःख होते. हीच गोष्ट इतर स्थिर आणि चर पदार्थांची आहे.अरियपरियेसनसुत्तांत भगवंत म्हणतात ,
''भिक्षुहो, मी सुद्धा संबोधिज्ञान होण्यापूर्वीबोधिसत्वावस्थेत, स्वतः जराधर्मी असताना, जन्माच्या फेर्यात सापडलेल्या वस्तुंच्या(पुत्र, दारा, दासी, दास इत्यादिकांच्या) मागे लागलो होतो. (म्हणजे माझे सुख त्यांजवर अवलंबून आहे असे मला वाटे.) स्वतः जराधर्मी असताना,व्याधिधर्मी असताना मरणधर्मी असताना, शोकधर्मी असताना, जरा, व्याधि, मरण, शोक यांच्या फेर्यांत पडलेल्या वस्तूंच्याच मागे लागलो होतो. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की,मी स्वतः जन्म, जरा, मरण, व्याधि व शोक यांनी संबद्ध असता, त्यांनीच संबद्ध जे पुत्रदारादिकत्याच्या मागे लागलो आहे, हे ठीक नव्हे; तर मग मी या जन्मजरादिकांनी होणारी हाणी पाहूनअजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असे जो परमश्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध करावाहे योग्य आहे.'' हा भगवंताचा बोधिसत्त्वावस्थेतील अनुभव सर्वांनाच लागू पडण्यासारखा आहे.बाह्यसृष्टीतील पदार्थांना पकडून बसल्यास जसे दुःख होते, तसेच ते आपल्या पंचस्कंधालापकडून बसल्यास होते. आपले रूप असे रहावे किंवा तसे व्हावे असा आपण विचार केलातरी व्याधीच्या आणि जरेच्यायोगे ते भलत्याच स्थितीत जाते. वेदना, संज्ञा, संस्कार आणिविज्ञान यांचीहि हीच गोष्ट आहे. त्यांना पकडून बसल्याने आपल्या दुःखात अधिक भर पडते,याचसाठी म्हटले आहे की,यदनिच्चं ते दुक्खं.'जे दुःखकारक ते आत्मा होऊ शकत नाही. आत्मा म्हणजे सुखदुःखातील कटस्थ,अविनाशी पदार्थ. तो या पंचस्कंधात नाही, आणि म्हणूनच मनुष्यप्राण्यांमध्ये आपणालाकायमचा उच्चनीचपणा येणे शक्य नाही. अलगद्दपमसुत्तांत भगवंत म्हणतात , ''म्हणूनभिक्षुहो, जे तुमचे नव्हे, ते सोडून द्या. ते सोडून दिल्यास चिरकाल तुमचे हित होईल,चिरकाल तुम्हाला सुख मिळेल. तुमचे काय नव्हे ? रुप तुमचे नव्हे ... वेदना तुमच्या नव्हेतपडलेला पालापाचोळा लोक घेऊन जातील, जाळतील. किंवा त्याचे दुसरे काही तरी करतील.त्या वेळी, 'आम्हांला लोक घेऊन जातात, जाळतात. किंवा आमचे दुसरे काही तरी करतात,असे तुम्हांला वाटेल काय ?'' भिक्षु म्हणाले, ''भदन्त, आमला असे वाटणार नाही; कारण,हा पालापाचोळा आमचा आत्मा किंवा आत्मीय नाही.'' भगवान् म्हणाला, ''त्याचप्रमाणेभिक्षुहो, रूप... वेदना...संज्ञा...संस्कार...विज्ञान तुमचे नाही. ते सोडून द्या.ते सोडून दिल्यास चिरकाल तुमचे हित होईल, चिरकाल तुम्हांस सुख मिळेलएकान्तस्थळी जाऊन शांत चित्ताने यथार्थतया पदार्थाचे निरीक्षण करणार्या भिक्षूला अमानुषआनंद प्राप्त होतो. जो जो तो स्कन्धांचा उदय आणि व्यय यांचे निरीक्षण करतोतो तो त्याला प्रीतिप्रमोद मिळत जातो. सुज्ञांना हे अमृत वाटते.
!!मंगल हो !
@बालस्नेही
टिप्पण्या