मुख्य सामग्रीवर वगळा

'Dhammadut"

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...

बुद्धाचे संदेशवाहक राष्ट्रपाल धम्मधूत

 श्रद्धेनें प्रव्रज्या घेतलेल्या भिक्षुश्रावकांत राष्ट्रपाल श्रेष्ठ आहे.

                भगवान् बुद्ध कुरुराष्ट्रांत प्रवास करीत मोठ्या भिक्षुसंघासह थुल्लकोद्वित नांवाच्या कुरूंच्या शहरापाशीं आले , तेथील ब्राह्मणांनीं त्यांची कीर्ति ऐकून ते सर्व त्यांच्या  दर्शनाला गेले. कोणी त्यानां नमस्कार करून, कोणी कुशल प्रश्न विचारून, कोणी अंजलि करून, कोणी आपलें नामगोत्र सांगून व कोणी मुकाट्यानेंच जाऊन एका बाजूला बसले. त्या ब्राह्मणांना भगवंतानें जेव्हां धर्मोपदेश केला तेव्हां राष्ट्रापालहि तेथें होता. त्याच्या मनावर एकदम परिणाम झाला, व प्रव्रज्या घेण्याचा आपला विचार त्यानें भगवंताना  कळविला. पण त्याच्या आईबापांची परवानगी नसल्यामुळें त्याला प्रव्रज्या देण्याचें भगवंतानी  नाकारलें. तेव्हां घरीं जाऊन प्रव्रज्या घेण्यास परवानगीं देण्याविषयीं आपल्या आईबापांशीं तो हट्ट धरून बसला. त्यांनीं त्याची पुष्कळ प्रकारें समजूत घातली, व आपण जिवंत असतां त्याला परवानगी देतां येणें शक्य नाहीं असें सांगितलें. एकतर परवानगी किंवा दुसरें मरण,’ असें म्हणून राष्ट्रपाल तेथेंच जमिनीवर पडला, व अन्नग्रहण करणें त्यानें वर्ज केलें. त्याच्या सख्यासोयर्‍यांनींहि त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला. पण राष्ट्रपालाच्या दृढ निश्चयापुढें त्यांचा कांहीं इलाज चालेना. शेवटीं आईबापांनीं परवानगी देऊन कसें बसें त्याचें एकदाचें समाधान केलें; व अन्न खाऊन अंगी थोडें बळ आल्याबरोबर भगवंतापाशीं जाऊन त्यानें प्रव्रज्या घेतली. दोन आठवड्यांनीं भगवान् त्याला बरोबर घेऊन भिक्षुसंघासह श्रावस्तीला आला.तेथें रहात असतां एकान्तांत राहून राष्ट्रपालानें मोठ्या प्रयत्‍नानें अर्हत्पद मिळविलें, व भगवंताजवळ जाऊन आईबापांस भेटण्याची परवानगी मागितली. आर्यमार्गांत त्याची झालेली उन्नति पाहून भगवंतानी  त्याला स्वदेशीं जाण्यास परवानगी दिली. भिक्षाटनासाठीं जेव्हां तो थुल्लकोट्ठित शहरांत शिरला, तेव्हां त्याचा पिता मधल्या दिवाणखान्यांत हजामतीला उल्लिखापेति.त्यावर टीका-कप्पकेन केसे अपहरापेति. परंतु दुसरा असाहि अर्थ होऊं शकेल कीं, मधल्या दिवाणखान्यांत चित्रकर्म करवीत होता. येथें टीकेला अनुसरूनच अर्थ केला आहे. बसला होता. राष्ट्रपालाला पाहून ह्या मुंडकांनीं ह्या ,श्रमणकांनीं आमच्या आवडत्या एकुलत्या एका मुलाला भिक्षु केलेंअसें तो म्हणाला. अर्थात् राष्ट्रपालाला आपल्या पित्याच्या घरीं शिव्यांशिवाय दुसरा पदार्थ मिळाला नाहीं. तो परत जाण्याला निघाला तेव्हां त्याच्या घरची एक दासी कुल्माष नांवाची शिळें अन्न फेकण्यासाठीं बाहेर आली होती. तिला पाहून राष्ट्रपाल म्हणाला, भगिनी, हें अन्न फेकावयाचें असेल तर माझ्या पात्रांतच तें घाल. तें तिनें त्याच्या पात्रांत घातलें, व इतक्यांत तिची खात्री पटली कीं, हाच आपल्या मालकाचा पुत्र आहे. ताबडतोब हें वर्तमान तिनें आपल्या यजमानिणीला सांगितलें. ती म्हणाली, हें वर्तमान जर खरें असेल तर तुला मी दास्यांतून मोकळें करीन. असें म्हणून तिनें नवर्‍याला राष्ट्रपालाच्या शोधासाठीं पाठविलें.राष्ट्रपाल एका भिंतीच्या सावलींत बसून तें शिळें अन्न खात होता. तें पाहून त्याचा पिता म्हणाला, बाळ राष्ट्रपाला, हें शिळें अन्न तूं कसे खातोस? हे तुझें घर नाहीं काय?गृहपति, आम्हांला आमचें घर कुठलें? आम्हीं तें कधींच सोडून दिलें आहे. आपल्या घरीं गेलोंहोतों खरा; परंतु तेथें शिव्यांशिवाय दुसरें कांहीं मला मिळालें नाहीं.पित्यानें त्याला घरीं येण्याचा आग्रह केला; पण त्या दिवशीं जेवण झालें असल्यामुळे त्यानें आमंत्रण न स्वीकारतां तें दुसर्‍या दिवशीं चे स्वीकारलें. राष्ट्रपाल सकाळच्या प्रहरीं भोजनासाठीं आला, तेव्हां पित्यानें आपली सर्व धनदौलत दाखवून त्याला प्रपंचांत आणण्याचा पुष्कळ प्रयत्‍न करून पाहिला. शेवटीं त्याच्या पत्नी कडून त्याचे पाय धरावयास लावले. परंतु ह्या सर्वांचा परिणाम राष्ट्रपालाच्या मनावर मुळींच झाला नाहीं. तो म्हणाला, मला उपद्रव कशाल देतां?  जर जेवावयाला घालावयाचें असेल तर घाला. पित्यानें त्याला उत्तम प्रकारचे भोजन दिलें.  त्या नंतर राजा खालीं बसला व राष्ट्रपालाला म्हणाला, जराव्यसन, व्याधिव्यसन, भोगव्यसन व ज्ञातिव्यसन, ह्या चार व्यवसनांमुळें लोक प्रव्रज्या घेत असतात. कोणी म्हातारा झालेला असतो, व आतां आपल्या हातून दुसरें कांहीं होणें नाहीं, असें म्हणून प्रव्रज्या घेतो. कोणी जन्माचा व्याधिग्रस्त असतो, व प्रपंच नकोसा होऊन संन्यासी होतो. कोणाची एकाएकीं सर्व संपत्ति नष्ट होते, व ह्या भोगव्यसनामुळें तो संन्यासी होतो. कोणाचे सखेसोयरे अकस्मात् मरण पावतात, व ह्या ज्ञातिव्यसनामुळें तो भिक्षु होतो. पण ह्या चारहि व्यवसनांपासून तुम्ही मोकळे आहां. असें असतां ह्या वयांत भिक्षु झालांत, याचें कारण काय?महाराज, त्या सम्यक्संबुद्धानें ज्या चार गोष्टी सांगितल्या आहेत, त्या ऐकून, पाहून आणि जाणून मी भिक्षु झालों आहें.

 (१) जीवलोक हांकला जात आहे, त्याला थारा नाहीं;

(२) त्याचें रक्षण करणारा कोणी नाही, त्याला सुरक्षित जागा नाहीं;

 (३) त्याचें स्वकीय असें कांहीं नाहीं, सगळें सोडून त्याला गेलें पाहिजे;

(४) त्याची तृप्ति नाहीं, तृष्णेचा तो दास आहे. ह्या त्या चार गोष्टी आहेत, ज्या ऐकून, पाहून आणि जाणून मी भिक्षु झालों.

मंगल हो !!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तथागताच्या जीवनात आषाढीपौर्णिमेस घडलेल्या महत्त्वाच्या घटना"

आषाढी पौर्णिमा :-  शाक्यमुनी भगवान, सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस महत्त्वाच्या चार घटना .                           पहिली घटना:-"राणी महामायेचे स्वप्न"  आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते, राणीने या स्वप्नात पाहिले की, चारही दिशेने दूत येतात राणीचा शाही पलंग  उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शाल वनाजवळ अनोतवदह नावाच्या सरोवरावर नेतात व सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षाखाली ठेवतात सर्वांगास सुगंधी लेप लावून राणीला स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात, राणीस सुगंधी फुलांनी सजवितात, काहीवेळाने सहा दातांचा शुभ्र गजरात येतो त्याने आपल्या सोंडेने श्वेत कमल पुष्पाची माळ धारण केलेली असते. राणीच्या शयये भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो ,नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते राजाला सांगितले तेव्हा त्...

"तथागत बुद्धांच्या जीवनात श्रावण पौर्णिमेचे महत्व"

  #अंगुलीमालाची दीक्षा श्रावण पौर्णिमा इ .स पु .,५०४ १)सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना , एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर  होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न के...

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...