तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
“विनयधर भिक्षुणीश्राविकांत पटाचारा श्रेष्ठ आहे.”
पटाचारा
ह्यांचा
जन्म श्रावस्ती येथें एका सावकाराच्या कुटुंबांत झाला ,वयांत आल्यावर आपल्या वडिलांच्या एका नोकरावर तिचें मन जडलें. अर्थातच
ही गोष्ट घरांत कोणास माहीत नव्हती. पुढें समानजातीच्या तरुणाबरोबर तिचें लग्न
ठरलें असतां ह्या नोकराला बरोबर घेऊन, व बरोबर नेण्याजोगे दागदागिने घेऊन ती घरांतून निघून गेली. तीं दोघे श्रावस्तीहून तीन चार योजनांच्या
अंतरावर एका खेडेगांवीं जाऊन राहिलीं. कांहीं काळानें ती गरोदर झाली, व नवमास पूर्ण झाल्यावर आपल्या वडीलांच्या घरीं जाण्यास सिद्ध झाली. नवर्याला ही गोष्ट
इष्ट नव्हती. म्हणून तो आजउद्यां करीत राहिला. शेवटीं ती एकटीच निघाली. नवर्यानें
मागोमाग येऊन तिला गांठलें. वाटेंतच तिला मुलगा झाल्यामुळें श्रावस्तीला जाण्याचा
बेत रहित करून तीं आपल्या राहत्या गांवीं आलीं. पुन्हां कांहीं वर्षांनीं ती गरोदर
झाली, व नवमास पूर्ण झाल्यावर नवरा टंगळमंगळ करीत असतां
एकटीच श्रावस्तीला जाण्यास निघाली. एका निर्जन प्रदेशांत तिला नवर्यानें गांठलें.
तेथेंच तिला प्रसवनेदना होऊं लागल्या. इतक्यांत अकालमेघ उद्भवून जिकडे तिकडे
पाणीच पाणी होऊन गेलें. अशा स्थितींत आपणावर कांहीं तरी आच्छादन असावयास पाहिजे,
असें ती नवर्यास म्हणाली. त्यानें खुंट वगैरे गाडून एक झोंपडी
बनविण्यास आरंभ केला. ती शाकारण्यासाठीं एका वारुळाजवळ असलेलें गवत कापीत असतां,
तेथील भयंकर कृष्णसर्प त्याच्या पायाला चावला, व तो मरून खालीं पडला. इकडे त्याची स्त्री प्रसूत होऊन पुत्र प्रसवली,
व ती सारी रात्र दोन्ही मुलांना उराशीं घेऊन तिनें मोठ्या संकटांत
घालविली. ‘मी अनाथ झालेली पाहून मला माझा पति सोडून तर गेला
नसेल ना?’ असें तिला वारंवार वाटे.पण दुसर्या दिवशीं इकडे
तिकडे हिंडत असतां तिला त्याची गत काय झाली हें समजलें. तेव्हां मुलांना घेऊन
कोठें तरी गांवाच्या जवळ जाण्याच्या उद्देशानें ती तशीच पुढें चालली. लहान मुलाला
ओटींत, व मोठ्या मुलाला तिनें हातांत धरलें होतें. वाटेंत
पावसामुळें एका ओढ्याला बरेंच पाणी आलें होतें. तेव्हां मोठ्या मुलाला अलीकडच्या
तीरावर ठेवून व धाकट्याला पलीकडच्या तीराला घेऊन जाऊन त्याला तेथें चिंध्यांच्या
बिछान्यावर निजविलें, व ती परत येऊं लागली. ती त्या
ओढ्याच्या मध्यभागीं आल्यावर एक ससाणा धाकट्या मुलाला पकडण्यासाठीं येत असलेला
तिनें पाहिला. जोरानें हात हालवून ती त्या ससाण्याला पळवूं लागली. पण त्यामुळें,
आई आपणास बोलावते आहे असें वाटून मोठ्या मुलानें ओढ्यांत उडी टाकली
व तो वाहून गेला!
इकडे धाकट्या मुलाला बचावण्यासाठीं ती धावत आहे, तोंच ससाणा त्याला घेऊन पळून गेला. त्यायोगें अत्यंत शोकाकुल होऊन, -
दोघे पुत्र मेले, मेला माझा पति।
असें म्हणत ती श्रावस्तीला आली.
इकडे धाकट्या मुलाला बचावण्यासाठीं ती धावत आहे, तोंच ससाणा त्याला घेऊन पळून गेला. त्यायोगें अत्यंत शोकाकुल होऊन, -
दोघे पुत्र मेले, मेला माझा पति।
असें म्हणत ती श्रावस्तीला आली.
तेथें तिचे आईबाप व भाऊ घराला आग लागून एकाच
ठिकाणी जळून मेल्याचें तिला वर्तमान समजलें. तेव्हां ती अगदींच वेडी होऊन गेली,
व म्हणूं लागली कीं,
दोघे पुत्र मेले, मेला माझा पति।
आईबाप जळती, बंधूसह १ ।।
मूळ गाथा थेरी अपदानांत आहे.
उभो पुत्ता कालकता पत्थे मय्हं पति मतो।
माता पिता च भाता च एकचितकस्मिं डय्हरे।।
दोन्ही पुत्र मेले. मार्गांत माझा पति
मेला. आईबाप आणि भाऊ एकाच चितेवर जळाले.
अशा स्थितींत ती उघडी नागडी भटकत असे, व कोणी कपडा दिला तर तो फाडून फाडून
त्याच्या चिंध्या करी,म्हणून तिला पटाचारा हें नांव पडलें. एके दिवशीं भगवान्
बुद्ध जेतवनांत पुष्कळ लोकांना धर्मोपदेश करीत असतां ती तेथें येऊन एका बाजूला उभी
राहिली. तेव्हां भगवंतानी मैत्रीभावनेनें
तिच्याकडे पाहिलें, आणि तो म्हणाला,
“भगिनी शुद्धीवर ये,
भगिनी शुद्धीवर ये.”हे शब्द कानीं पडल्याबरोबर तिच्या मनांत
अत्यंत लज्जा उद्भवली, व ती
मटकन खालीं बसली. जवळ उभा असलेल्या एका मनुष्यानें आपलें उपरणें तिच्या अंगावर
फेकलें. तें नेसून ती धर्मश्रवण करूं लागली. तेव्हां भगवान् म्हणाले , “पुत्र,
पिता किंवा बांधव आपलें रक्षण करूं शकत नाहींत. व ते आपल्या सोबत जीवनभर राहू शकत नाहीत
,प्रत्येकाला स्वताचे आयुष्य जगावेच लागते
,तथागताच्या बोलण्याचा तिच्या मनावर परिणाम झाला व तिनें भिक्षुणींच्या संघांत
प्रवेश केला व क्रमानें अर्हत्पद मिळविलें. भिक्षुसंघांत जसा उपालि स्थविर
विनयाच्या नियमांत कुशल होता, तशी भिक्षुणीसंघांत पटाचारा कुशल होती ,म्हणून
विनयधर भिक्षुणींत तिला अग्रस्थान मिळालें..
मंगल हो !!!

टिप्पण्या