मुख्य सामग्रीवर वगळा

'Dhammadut"

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...

आळारकालाम

 आळारकालाम

घर सोडून बोधिसत्त्व थेट राजगृहाला गेले , तेथे त्यांची  व बिंबिसार राजाची भेट झाली आणि तदनंतर ते आळार कालामाकडे जाऊन त्याचे तत्त्वज्ञान शिकले , अशा अर्थाचे वर्णन जातकच्या निदनकथेत सापडते.अश्वघोषकृत बुद्धचरितकाव्यात निदानकथेचाच क्रम स्वीकारला आहे. बोधिसत्त्व प्रथम वैशालीला गेले व तेथे आलार कालामाचा शिGष्य झाले आणिनंतर राजगृहाला गेलेतेथे बिंबासार राजाने त्याची भेट घेतल्यावर तेउद्रक रामपुत्रापाशी गेले.’ अशा प्रकारचे सविस्तर वर्णन आहे.


सो एवं पब्बजितो समानो किंकुसलगवेसी अनुत्तरं सन्तिवरपदं परियेसमानो येन आळारो कलामो तेनुपसकमिं।
(भगवान म्हणतो),
याप्रमाणे प्रव्रज्या घेतल्यावर हितकर मार्ग कोणता हे जाणण्याच्या उद्देशाने श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा शोध करीत मी आळार कामापाशी गेलो.
बोधिसत्त्व राजगृहाला न जाता प्रथमत: आळार कालामा पाशी गेले. आळार कालाम कोसल देशाचाच रहिवासी होता.. शाक्य आणि कोलिय राज्यांत त्याची बरीच ख्याति होती. त्याच्या एका शिष्याचा--भरण्डू कालामाचा-- आश्रम कपिलवस्तूला होता. दुसरे त्याचे किंवा फार झाले तर उद्दक रामपुत्ताचे शिष्य जवळच्या कोलयाच्या देशात राहत असत. आणि या संप्रदायाचे प्रस्थ शाक्य आणि कोलिय देशात बरेच होते यात शंका नाही. बोधिसत्त्व प्रथमध्यानाची पद्धति ह्याच परिव्राजकांकडून शिकला आणि त्यांनीच त्याला संन्यासदीक्षा दिली असली पाहिजे.
उद्दकरामपुत्त:-
आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघेही एकच समाधिमार्ग शिकवीत होते. त्यांच्यात एवढाच फरक होता की, आळार कालाम समाधीच्या सात पायर्‍या व उद्दक रामपुत्त आठ पायर्‍या शिकवीत असे. या दोघांचा कोणी तरी एकच गुरू असावा आणि नंतर त्यांनी हे दोन पंथ काढले असावेत. आळार कालामाला सोडून बोधिसत्त्व उद्दकापाशी गेले . पण त्याच्याही मार्गात त्याला विशेष तथ्य दिसले नाही. तेव्हा राजगृहाला जाऊन तेथील प्रसिद्ध श्रमणपंथांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याचा त्याने निश्चय केला.
बिंबासार राजाची भेटराजगृहात बोधिसत्त्वाच्या आगमनाचे वर्णन एका कवीने सुत्तनिपातातील पब्बज्जासुत्तात केले आहे, त्याचे भाषान्तर येणेप्रमाणे
चक्षुष्मन्ताने (बोधिसत्त्वाने) प्रव्रज्या का घेतली व कोणत्या विचारामुळे त्याला ती आवडली हे सांगून  प्रव्रज्येने मी वर्णन करतो.
 गृहस्थाश्रम ही अडचणींची आणि कचर्‍याची जागा व प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा असे जाणून त्याने प्रव्रज्या घेतली.. प्रव्रज्या घेऊन त्याने शारीरिक पापकर्म वर्ज्य केले. वाचसिक दुर्वर्तन सोडून दिले आणि आपली उपजिवीका शुद्ध मार्गाने चालविली.. बुद्ध मगधांच्या गिरिव्रजाला आले , सर्व शरीरावर उत्तम लक्षणे फैलावली आहेत अशा त्याने राजगृहात भिक्षाटनासाठी प्रवेश केला. आपल्या प्रासादावरून बिंबिसाराने त्याला पाहिले. त्याची लक्षणसंपत्ति पाहून बिंबासार म्हणाला,
अहो, मझे ऐका- हा सुंदर भव्य, शुद्ध आणि आचरणाने संपन्न असून पायापाशी दोन हाताच्या अंतरावर दृष्टि ठेवून चालतो.  हा दृष्टि पायापाशी ठेवून चालणारा जागृत भिक्षु कोठे जात आहे, हे राजदूतांना धावत जाऊन पाहू द्या.तो भिक्षु (बोधिसत्त्व) कोठे जातो व वस्तीला कोठे राहतो हे पाहण्यासाठी ते (बिंबिसार राजाने पाठविलेले) दूत त्याच्या मागोमाग गेले.
 इन्द्रिय़ाचे संरक्षण करीत घरोघरी भिक्षा घेऊन विवेकी आणि जागृत बोधिसत्त्वाने ताबडतोब पात्रभर भिक्षा मिळविली. भिक्षाटन पुरे करून तो मुनि नगरातून बाहेर पडला आणि वस्तीला येथे राहीन अशा उद्देशाने पाण्डव पर्वताजवळ आला.त्याला वस्तीला राहिलेला पाहून ते दूत त्याच्याजवळ बसले आणि त्यापैकी एकाने जाऊन राजाला खबर दिली.
महाराज, तो भिक्षू पाण्डव पर्वताच्या पूर्वेला व्याघ्यासारखा, ऋषभसारखा किंवा गिरिगव्हरात राहणार्‍या सिंहासारखा बसला आहे. ते दूताचे वचन ऐकून तो क्षत्रिय उत्तम यानात बसला व त्वरेने पाण्डव पर्वताकडे जाण्यास निघाला. जिथपर्यंत यानाने जाणे शक्य होते तिथपर्यंत जाऊन तो क्षत्रिय यानातून खाली उतरला आणि पायीच  जवळ येऊन त्याच्या संनिध बसला. तेथे बसून राजाने त्याला कुशलप्रश्नादिक विचारले. कुशलप्रश्नादिक विचारून ती येणेप्रमाणे बोलला :- तू जवान आणि तरुण आहेस, मनुष्याच्या प्रथम वयातला आहेस. तुझी कान्ति कुलीन क्षत्रियासारखी अत्यंत रोचक दिसते. तू हत्तीचा समुदाय बरोबर घेऊन माझ्या सेनेला शोभा आण. मी तुला संपत्ति देतो. तिचा उपयोग घे. आणि आता तुझी जाति कोणती हे मला सांग.हे राजा येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशी धनाने आणि वीर्याने संपन्न ज्याचा कोसल राष्ट्रात समावेश होतोअसा देश आहे.त्याचे गोत्र आदित्य आहे आणि त्यांच्या जातीला शाक्य म्हणतात, त्या कुलातून हे राजा मी परिव्राजक झालो, तो कोमपभोगांच्या इच्छेने नव्हे. नामोपभोगात मला दोष दिसला आणि एकान्तवास सुखाचा वाटला. आता मी तपश्चर्येसाठी जात आहे. त्या मार्गात माझे मन रमते.
या सुत्ताच्या तिसर्‍या गाथेत बोधिसत्त्वाने काया, वाचा व उपजीविका याचे संशोधन केल्याचा उल्लेख आला आहे. हे कृत्य घरातून निघाल्यानंतर वाटेतल्या वाटेत त्याला करता येणे शक्य दिसत नाही. आळार कालाम व उद्दक रामपुत्त यांच्यापाशी राहून त्यांचे आचारविचार नीट सांभाळून बोधिसत्त्वाने हे काम केले असावे असे दिसते. आता मी तपश्चर्येसाठी जात आहे,’ असे तो म्हणतो.परंतु शाक्य किंवा कोलिय देशातील एखाद्या आश्रमात राहून काल कंठणे बोधिसत्त्वाला योग्य वाटले नाही. हितकर मार्गाचा आणि श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा बोध करून घेण्यासाठी त्याने खुद्द आळार कालामाची भेट घेतली. त्या वेळी आळार कालाम कोठे तरी कोसल देशात राहत असावा. त्याने बोधिसत्त्वाला चार ध्याने व त्यांच्यावरच्या तीन पायर्‍या शिकविल्या. पण केवळ या समाधीच्या सात पायर्‍यांनी त्याचे समाधान झाले नाही. हा मनोनिग्रहाचा मार्ग होता खरा, पण सर्व मनुष्यजातीला त्याचा उपयोग काय? याचसाठी हितकर मार्गाचा शोधबोधिसत्त्वाने पुढे चालविलाआणि जगाला विपस्सना मार्ग अर्पण केला ..

मंगल हो !!!

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"तथागताच्या जीवनात आषाढीपौर्णिमेस घडलेल्या महत्त्वाच्या घटना"

आषाढी पौर्णिमा :-  शाक्यमुनी भगवान, सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस महत्त्वाच्या चार घटना .                           पहिली घटना:-"राणी महामायेचे स्वप्न"  आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते, राणीने या स्वप्नात पाहिले की, चारही दिशेने दूत येतात राणीचा शाही पलंग  उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शाल वनाजवळ अनोतवदह नावाच्या सरोवरावर नेतात व सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल वृक्षाखाली ठेवतात सर्वांगास सुगंधी लेप लावून राणीला स्नान घालतात स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात, राणीस सुगंधी फुलांनी सजवितात, काहीवेळाने सहा दातांचा शुभ्र गजरात येतो त्याने आपल्या सोंडेने श्वेत कमल पुष्पाची माळ धारण केलेली असते. राणीच्या शयये भोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो ,नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते राजाला सांगितले तेव्हा त्...

"तथागत बुद्धांच्या जीवनात श्रावण पौर्णिमेचे महत्व"

  #अंगुलीमालाची दीक्षा श्रावण पौर्णिमा इ .स पु .,५०४ १)सुमारे अडीच हजार वर्षांपुर्वी कोशल राष्ट्रांत प्रसेनजीत नावाचा राजा राज्य करीत असताना , एका रानात अंगुलीमाल नावाचा डाकु राहत होता. तो लोकांना मारुन त्याचे बोट कापुन त्या बोटांची माळ गळ्यात घालत असे. त्यामुळे लोक त्या अरण्यात जाण्यास टाळत असत. कोणाची तिथे जाण्याची हिंमत होत नसे. अंगुलीमालाची भिती सर्व राज्यात पसरली होती. अंगुलीमाच्या भितीमुळे लोक गाव सोडुन पळु लागली होती. म्हणुन अंगुलीमालाचा नायनाट करण्यासाठी महाराज प्रसेनजीतला अनेक विनंत्या येऊ लागल्या. त्यामुळे अंगुलीमालाला पकडुन आणण्यासाठी प्रसेनजीतने सैन्याची एक तुकडी पाठवली होती परंतु अंगुलीमालाने त्या सैन्याच्या तुकडीची कत्तल केली. असा अंगुलीमाल भयानक आणि क्रुर  होता.अंगुलीमालाच्या हिंसाचाराच्या गोष्टी देशोदेशी प्रसीद्ध झाल्या होत्या. एके दिवशी भगवान बुद्ध श्रावस्ती शहरातुन भिक्षाटन करुन परत येत असताना त्यांनी अंगुलीमाल जिथे रहात होता त्या वनाकडे वाट धरली. तेव्हा वाटेत ज्यांना कोणाला भगवान बुद्ध त्या मार्गाने जाताना दिसले त्यांनी भगवंतांना अडविण्याचा खुप प्रयत्न के...

वैशाख पौर्णिमा

तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...